| अलिबाग | प्रतिनिधी |
पीएनपी वाय. एम. पाटील इंग्लिश मिडियम स्कूल सांबरी शाळेची विद्यार्थिनी सारा अपर्णा स्वानंद कोठेकर हिची राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेकरिता निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रातून चार स्पर्धकांची निवड करण्यात आली होती, यामध्ये सारा हिचा समावेश होता. गोव्यामध्ये 6 व 7 ऑक्टोंबर रोजी पार पडलेल्या 14 व्या राष्ट्रीय युवा खेळ स्पर्धेकरिता चौगुले स्पोर्ट्स कॉलेजच्या प्रांगणात रंगलेल्या कराटे स्पर्धेत ऑरेंज बेल्ट करिता सारा हिने सुवर्ण पदक पटकावले. तिच्या यशस्वी नेत्रदीपक कामगिरी बद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका निशिगंधा मयेकर, श्वेता जुईकर, गंगोत्री म्हात्रे यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.