थांग-ता राज्य अजिंक्य स्पर्धेत मारली बाजी
| रायगड जिल्हा | प्रतिनिधी |
थांगता राज्यस्तरिय अजिंक्य स्पर्धा अमरावतीमध्ये पार पडली. या स्पर्धेत रायगडच्या चार मुलांनी सुवर्ण कामगिरी करीत जिल्ह्याचे नाव लौकिक केले. थांग-ता फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशनच्या माध्यमातून 19 ते 21 सप्टेंबर दरम्यान 29 वी थांगता राज्य चॅम्पियनशिप स्पर्धेत 25 जिल्ह्यातील 430 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 14 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
पेण-अलिबागच्या मुलांनी चार सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्य पदक मिळविले. पेण तालुक्यातील मोठे भाल गावाचा सुचित विजय म्हात्रे, अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील आदित्य सदानंद चव्हाण, वावे गावातील सार्थक तिडके, कुसूंबळेमधील श्रेया पुरुषोत्तम पिंगळे यांनी सुवर्ण पदक पटकावले. वेदिका संतोष कवळे नवगाव हिने रौप्य पदक प्राप्त केले. वागोडी गावाची तनिष्का राकेश पाटील हिने कांस्यपदक पटकावले. पेझारी गावातील प्रियुक्ता मृदुल म्हात्रे हिने कांस्य पदक पटकावले. प्रियुत्ता हीचा सर्वात लिटिल गर्ल म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. तिनविरा येथील सानिध्य नंदकुमार पाटील याला सर्वात छोटा मुलगा म्हणून सन्मानित करण्यात आले.
रामराजमधील लांयबा शहजाद अन्सारी हिने रौप्य पदक मिळविले असून कुणेमधील अंश अल्लाद नाईक, चोंढी – किहीमधील रुद्र किरण मोकल आणि बेलोशीमधील शुभ्रा सागर गायकर यांनी चतूर्थ क्रमांक मिळविला.अलिबागची कास्य पदक विजेती प्राप्ती समीर टावरी हिने कांस्य पदक मिळविले आहे. छवी सागर अग्रवाल पेझारी हिने 14 वर्षे मुलींच्या गटामध्ये चौथा क्रमांक मिळविला. सर्व विजयी स्पर्धकांची गोवा आणि आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली .या स्पर्धेचा बक्षीस समारंभ ऑल महाराष्ट्र थांगता असोसिएशनचे पदाधिकारी, मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक आणि सन्मानचिन्ह देऊन खेळाडूंचा गौरव करण्यात आला. प्रशिक्षक म्हणून या सर्व खेळाडूंना संतोष कवळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रायगडची महिला टीम मॅनेजर म्हणून नम्रता नंदकुमार पाटील यांनी काम पाहिले.
रायगडच्या मुलांचा सुवर्ण चौकार
