| अलिबाग | प्रतिनिधी |
26 वी शीतोरीयू कराटे डो चॅम्पियनशिप 2026 बुडो फाउंडेशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. 18 जानेवारी रोजी अलिबागमधील जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाली. यामध्ये इंडियन ओकिनावा शोरीन रियू क्युडोकान कराटे-डो इंडियाच्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्ह्याच्या संघाने सहभाग घेतला होता. या देशभरातील स्पर्धेत महाराष्ट्रसह 9 राज्य सहभागी झाले होत. त्यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, नागालँड आणि राजस्थान इत्यादी राज्यातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय स्पर्धेत विविध राज्यातून 787 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये रायगड जिल्ह्यातून क्युडोकान कराटे-डोच्या मुरुड व अलिबाग तालुक्यातील खेळाडूंनी रायगड संघाचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याचे नाव उंचावले. त्यांनी कुमिते व काता अशा 2 प्रकारात एकूण 5 सुवर्ण, 5 रौप्य व 13 कांस्य अशी एकूण 23 पदके जिंकून चमकदार कामगिरी केली.
सहभागी 17 खेळाडू अलिबाग तालुक्यातील संचालक मंडळ नागाव हायस्कूल, नागाव अलिबाग येथे प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये साजेरी पाटील 1 रौप्यपदक, मितांश पाटील 1 कांस्यपदक, त्रिशूल घरत 1 सुवर्णपदक, अनन्या खामित्कर 1 सुवर्णपदक, 1 कांस्यपदक, पूर्वी नाईक 1 सुवर्णपदक, 1 कांस्यपदक, अनुश्री कवळे 1 कांस्यपदक, मनोमय जाधव 1 कांस्यपदक, चरण हरे 1 सुवर्णपदक, 1 कांस्यपदक, तृष्णा मयेकर 1 रौप्यपदक, मेधांश पाटील, 1 रौप्यपदक, 1 कांस्यपदक, अर्चित वैद्य 1 सुवर्ण पदक, 1 रौप्यपदक, वीर गण 1 रौप्यपदक, स्मित दांडेकर 1 कांस्यपदक, दक्ष टिवळेकर 1 कांस्यपदक, माही जाधव 2 कांस्यपदक, मृणा मयेकर 1 कांस्यपदक, कर्णेश नाईक 1 कांस्यपदक पटकावले.
या सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक सिहान अरुण बोडके तसेच रेंशी अरविंद भोपी, सेंसाय प्रसाद चौलकर यांचे मार्गदर्शन लाभले. सेंपाय राधा ढापरे, सेंपाय अनुश्री भोपी, सेंपाय वेद संजय पाटील आणि सेंपाय दुर्वा निलेश नाईक यांचे सहकार्य लाभले.







