लाठी स्पर्धेत अलिबागचे नाव देशात उंचावले
| अलिबाग | प्रतिनिधी |
राष्ट्रीय लाठी स्पर्धा नुकतीच दिल्ली येथे पार पडली. या स्पर्धेत अलिबागमधील पाच वर्षांच्या रुद्रा विनय पिळणकर हिने सुवर्ण कामगिरी बजावून दिल्लीमध्ये अलिबागचे नावलौकिक केले. तिने एक सुवर्ण व दोन रौप्य अशी तीन पदके मिळवून अलिबागचे नाव देशात उंचावले.
या स्पर्धेत हजारो खेळाडूंनी सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या लाठी प्रकारात उत्तम कामगिरी बजावत तिने सुवर्ण व रौप्यपदक पटकावले. या पाच वर्षाच्या खेळाडूने केलेल्या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. रुद्राला या खेळासाठी प्रियंका संदेश गुजांळ, शुभम महेंद्र नखाते, वेदांत संदेश सुर्वे, सिद्धार्थ अशोक पाटील, माही खमिस यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले. लाठी असोसिएशन अलिबाग रायगड संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.