। नागोठणे । वार्ताहर ।
11 वी राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशीप स्पर्धा दि.22 ते 24 नोव्हेंबर या दरम्यान श्री जनार्दन स्वामी मठ त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी 9 सुवर्णपदक, 6 रौप्यपदक, 6 कांस्यपदक पटकावून आपला ठसा उमटवला. सर्व खेळाडूंवर रायगड जिल्ह्यातुन शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी माजी आ.जयवंत जाधव, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, राज्य संघटनेचे खजिनदार मुकेश सोनावणे, नगरसेवक दीपक दातीर, शिवसेना महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाप्रमुख मंदा दातीर, अँमचेर सिलंबम फेडरेशन ऑफ इंडियाचे उपसचिव सुरेखा येवले आदी मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंमध्ये श्रियश सचिन शेडगे, उमेद जितेंद्र जाधव, सोहा मेहुल मेहता, हर्षिता हेमंत कामथे, समृद्धी संतोष राऊत, स्मित नरेश ठाकुर, समर नरेश ठाकुर, रोहित परशुराम गायकवाड, धनंजय जगताप यांचा समावेश आहे.
रौप्यपदक विजेत्या खेळाडूंध्ये मित महेंद्र धामणे, अनिश किरण पालकर, प्रथमेश रवि देशमुख, रुचल चंचल जाना, नेहा हिरामण दोरे, करीम जावेद शेख या सहा जणांचा समावेश आहे. तर कांस्यपदक विजेते खेळाडूंध्ये अनिश किरण पालकर, प्रथमेश रवी देशमुख, हर्षिता हेमंत कामथे, समर नरेश ठाकूर, श्रेयश सचिन शेडगे व रोहित परशुराम गायकवाड यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळविले. या राज्यस्तरीय स्पर्धेत पंच म्हणून अक्षय मांडवकर यांनी तर रायगड जिल्ह्याचे प्रशिक्षक म्हणून गौरव राऊत यांनी कामगिरी पाहिली.
या स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र प्रताप सिंग (सी.ए ), इंडियन पिंच्याक सिलॅट संघटनेचे अध्यक्ष किशोर येवले, राज्य संघटनेचे खजिनदार मुकेश सोनवणे आदी मान्यवरांच्या य हस्ते करण्यात आले. अशी माहिती माहिती रायगड जिल्हा पिंच्याक सिलॅट संघटनेचे अध्यक्ष रुपेश जाधव यांनी दिली.