रायगडच्या मूसाची ‌‘सुवर्ण’ नेमबाजी

| पनवेल | प्रतिनिधी |

पटियाला पंजाब येथे ‌‘0175 ऑल इंडिया ओपन कॉम्पिटिशन शॉटगन 2024′ नेमबाजी स्पर्धा नुकतीच पार पडली. या नेमबाजी स्पर्धेत रायगडचा नेमबाज मूसा मेहमूद काझी याने महाराष्ट्र रायफल संघटनेचे प्रतिनिधित्व करत ट्रॅप शूटिंग शॉटगनमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सिद्धांत रायफल क्लबचे नेमबाज मुसा मेहमूद काझी (गोरेगाव), साईम झुबेरखान देशमुख (महाड) व आदित्य राजेश यादव (कामोठे) या नेमबाजांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत 100 हुन अधीक स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता. यावेळी रायगडच्या मूसाने अचूक नेम धरत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरून महाराष्ट्रला सुवर्ण पदकाची कमाई करून दिली. तसेच, 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी मुसा काझीसह आदित्य यादवची देखील निवड झाली आहे. साईम देशमुखचे 2 पॉईंट्ससाठी निवड राहिली. या सर्वांनी प्रशिक्षक राल्स्टन कोयलो यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडी पुणे येथे ट्रॅप शूटिंगचे प्रशिक्षण घेतले आहे.

या सर्वांचे सिद्धांत रायफलचे सेक्रेटरी राष्ट्रीय नेमबाज रायगड भूषण किशन खारके, अलंकार कोळी व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version