। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
लिमा (पेरू) येथे सुरू असलेल्या ज्युनिअर जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताने आणखी दोन पदकाची कमाई केली आहे. नेमबाज मनु भाकेर हिने दुसरे सुवर्णपदक पटकावले आहे. 10 मीटर एअर पिस्टल मिक्स प्रकारात मनु भाकेर हिने सरबजोत सिंगसोबत सुवर्णकामगिरी केली आहे. तर, 10 मीटर एअर रायफल पुरुष गटात श्रीकांत धनुष, राजप्रीत सिंग आणि पार्थ माखिजा यांनी उल्लेखनीय कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या जुनिअर जागतिक स्पर्धेत भारत पदकतक्त्यात सध्या पहिल्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन ब्राँंझपदकासह 11 पदके जमा आहेत. 10 मीटर एअर पिस्टल मिक्स प्रकारात मनु भाकेर आणि सरबजोत सिंग यांच्यासमोर भारताच्या दुसर्या जोडीचं आवाहन होतं. मनु भाकेर आणि सरबजोत यांनी भारताच्या शिखा नरवाल आणि नवीन यांना पराभव गेला. सुवर्णपदाच्या सामन्यात मनु भाकेर आणि सरबजोत यांनी शिखा नरवाल आणि नवीन यांचा 16-12 च्या फरकाने पराभव केला. पात्रता फेरीत आठ संघाचा समावेश होता. यामध्ये भारताच्या दोन्ही संघाने बाजी मारली. पात्रता फेरीत मनु भाकेर आणि सरबजोत यांना 386 तर शिखा आणि नवीन यांना 385 गुण मिळाले होते.