कुस्ती स्पर्धेत मुलींचे सुवर्ण यश

| पाताळगंगा | वार्ताहर |

रायगड जिल्हा परिषद शाळा वडवळ यांची खालापूर तालुक्यातील कारमेल स्कूल खोपोली येथे नुकताच कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 36 किलो वजनी गटामध्ये हंसिका हरिश्‍चंद्र कुंभार, तसेच 46 किलो वजनी गटामध्ये जान्हवी दिनेश सकपाळ व 30 किलो वजनी गटामध्ये ऋतुजा राजेंद्र मरागजे यांनी प्रथम क्रमांक पटकावून सुर्वणपदक पटकाविले. या यशाबद्दल शालेय कमिटी शिक्षक, तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून कौतुक होत आहे.

या स्पर्धेतील उत्तम कामगिरीमुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी मुंबई येथे निवड झाली आहे. त्यांनी उत्तम प्रकारे कुस्ती खेळून आपल्या शाळेचे, गावाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी सर्व शिक्षक, पालक वर्गांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर थळे यांनी मुलींचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा खालापूरचे सरचिटणीस राजाराम जाधव, दत्तात्रय सताने, विजया शिंदे, शीतल गोळे, भिकाजी कदम, त्याचबरोबर उत्तम असे कुस्ती खेळल्यामुळे वस्ताद पै संदेश मरागजे यांचेही अभिनंदन केले.

Exit mobile version