97 किलो वजनी गटात मुनांवर खाचे प्रथम
| तळा | वार्ताहर |
क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, मुंबई विभाग स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा 2022 मध्ये कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथील मुनांवर खाचे याने 97 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे.
दि. 15 ते 17 डिसेंबरदरम्यान टाटा कॉलनी स्पोर्ट्स हॉल इसांबा फाटा खालापूर येथे 19 वर्षे वयोगट कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत तळा महाविद्यालयाचा मुनांवर कलंक खाचे याने 97 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. ग्रीको रोमन्स कुस्ती स्पर्धा प्रकारात 63 किलो वजनी गटात साहिल संजय लोखंडे याने द्वितीय, तर 87 किलो वजनी गटात शुभम विनायक रसाळ यानेही द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर फिस्टाईल कुस्ती प्रकारात सुजल विनायक रसाळ याने 74 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवून कुस्ती स्पर्धेत यश प्राप्त केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी या अगोदर झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतही उत्तम यश मिळविलेले होते. या सर्व गुणवंत विजयी स्पर्धकांना प्रा. पोपटराव कसबे सर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले होते. ग्रामीण विभागातही कनिष्ठ महाविद्यालय, उत्तम सुविधा व कोच नसूनही हे मिळविले यश म्हणजे खर्या अर्थाने परिश्रमाचे चीज झाले आहे. त्यांनी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव रोशन केले असून संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, सचिव मंगेश देशमुख, चेअरमन महेंद्र कजबजे, विश्वस्त कार्यकारणी सदस्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून प्रा. पोपटराव कसबे सर यांचेही अभिनंदन केले आहे.