महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंचे सोनेरी यश

जागतिक पोलीस अँड फायर गेम्समध्ये फडविला तिरंगा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

महाराष्ट्राचा तीन वेळचा ‌‘महाराष्ट्र केसरी’ विजेता चाळीसगावचा विजय चौधरी व मुंबईचा नरसिंग यादवसह बीडचा राहुल आवारे हे भारतासाठी सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक करत जगज्जेते बनले आहेत. कॅनडाच्या विनिपेग येथे सुरू असलेल्या जागतिक पोलीस अँड फायर गेम्सच्या कुस्ती स्पर्धेत या तिघांनी सोनेरी यश मिळवले.

पुरुषांच्या 125 किलो वजन गटात फ्रीस्टाइल प्रकारात अंतिम लढतीत विजय चौधरीने अमेरिकेच्या जे. हेलिंगरवर 10 गुणांची मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर 11-01 गुणांनी सामना जिंकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. दुसरीकडे राहुल आवारेने 61 किलो वजन गटात पोलंडच्या मल्लाला 14-4 गुणांनी पराभूत करत सेोनेरी कामगिरी केली. नरसिंग यादवने 79 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर शरीरसौष्ठव स्पर्धेत सुभाष पुजारीने रौप्यपदक व मेन फिजिक्स प्रकारात कांस्यपदक मिळवले. सचिन शिंदेने शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्य व मेन फिजिक्स प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे.

Exit mobile version