• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

अलविदा 2023

Varsha Mehata by Varsha Mehata
December 30, 2023
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दिवस उजाडणे आणि मावळणे हा सृष्टीचा नियम आहे. माणूस त्यांना सेकंद, तास, दिवस, वर्षे अशा कोष्टकात बसवतो. त्या कोष्टकात एक 31 डिसेंबरचा दिवस येतो. माणसे जुन्या वर्षाचा हिशेब करतात. काय गेले, काय मिळाले याचा ताळेबंद मांडतात. तसा तो यंदाही मांडतील. 2023 हे वर्ष लवकर मावळेल. या वर्षाने किती काय दाखवले हे आठवतील. आधीची दोन वर्षे कोविडच्या सावटाखाली गेली. 2022 मध्ये कोविडमधून हळूहळू दुनिया बाहेर आली. कोविडमुळे जग कायमचे बदलून जाईल, लोकांच्या सवयी बदलतील, आर्थिक व्यवहार पालटून जातील असे तर्क केले जात होते. गेल्या वर्षी अशा बदलांच्या काही खुणा दिसल्या. पण 2023 मध्ये जग पुन्हा मूळ पदावर आलेले दिसले. बड्या कंपन्यांमध्ये बराच काळ घरून काम करण्याची सवलत देण्यात आली होती. ती यंदा हळूहळू काढून घेण्यात आली. माणसे पुन्हा प्रचंड गर्दीत प्रवास करून कामावर जाऊ लागली. काही कंपन्यांमध्ये हायब्रीड मॉडेल चालू आहे. आठवड्यातून काही दिवस घरून काम केलेले चालते. ठराविक दिवस कार्यालयात यावे लागते. पण अशा कंपन्यांची संख्या कमी आहे. घरून काम करण्याचे दोन टोकाचे अनुभव आले. काही ठिकाणी काम कमी होते असे दिसले. तर काही ठिकाणी माणसे मोबाईलवर चोवीस तास कंपनीच्या कामासाठी अडकून पडू लागली आहेत असेही आढळले. त्यापेक्षा कार्यालयात जाऊन ठराविक तास काम करणे सोईचे होते. त्यामुळे गेल्या दोन-तीन शतकांपासून चालू असलेली कार्यालयात जाऊन काम करण्याची पध्दत या शतकात निदान आणखी काही वर्षे तरी चालूच राहील हे 2023 मध्ये स्पष्ट झाले. जागतिक अर्थव्यवस्थेतला कमालीचा विरोधाभास हे या वर्षातले दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य. एकीकडे अमेरिका, चीन व युरोपात मंदीसदृश वातावरण असताना भारतीय अर्थव्यवस्था ज्या वेगाने धावत होती ते चकित करणारे होते.

पोकळ देखावा

आपल्या शेअर बाजाराने तर जगातल्या सर्वांनाच तोंडात बोटे घालायला लावली आहेत. एकेकाळी अमेरिकी बाजारात पाऊस झाला की मुंबई शेअर बाजाराला सर्दी होत असे. आता तसे घडत नाही. मुंबई शेअर बाजारावर जगातल्या कोणत्याच घटनांचा फार काळ परिणाम होत नाही अशी स्थिती आली आहे. सध्या बाजाराचा निर्देशांक 72 हजारांच्या वर गेला आहे. आता तो एक लाख कधी होतो याचीच जणू सगळे वाट पाहत आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्याला यंदा एक वर्ष पूर्ण झाले. या युध्दामुळे युरोपातील अर्थव्यवस्था कोलमडून जातील अशी भाकिते केली जात होती. कारण, जर्मनी, फ्रान्स व बरेच युरोपीय देश रशियाच्या क्रूड तेल व गॅसवर अवलंबून आहेत. पण या सर्व देशांनी या प्रश्नातूनही आपापला मार्ग काढला. रशियाचा पुरवठाही पूर्णपणे खंडित झाला नाही. त्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था कोसळेल इत्यादी जे अंदाज बांधण्यात आले होते तेही कोसळले. अमेरिकी तेल कंपन्या आणि मध्य आशियातील गॅसपुरवठादार देश यांचा फायदा झाला. यामध्ये एकूण युध्द होवो वा त्सुनामी येवो, जगाची अर्थव्यवस्था थांबणारी नाही हा संदेश या वर्षाने पुन्हा एकवार सर्वांना दिला. याच वर्षाच्या उत्तरार्धात हमासने इस्राइलवर हल्ला केला. परिणामी इस्राइलने पॅलेस्टाईनविरुध्द युद्ध छेडले. या युध्दात आतापर्यंत 21 हजार लोक मारले गेले आहेत. हे केवळ म्हणायलाच युद्ध आहे, खरे तर ही एक भीषण कत्तलच आहे. इस्राइलचा प्रतिकार करण्याची पॅलेस्टिनींमध्ये ना लष्करी ताकद आहे ना आर्थिक शक्ती. एकोणीस व विसाव्या शतकात ब्रिटन इत्यादींची साम्राज्ये होती. त्यांचे गुलाम देश होते. त्यामुळे अधूनमधून युद्धे आणि क्वचित महायुध्द होणार हे गृहितच होते. एकविसाव्या शतकात सर्व देश देखाव्यापुरते का होईना एकदुसऱ्याचा सन्मान करायला हवा हे तत्व मान्य करू लागले. पण हा देखावा किती पोकळ आहे हे 2023 ने अधोरेखित केले.

नवे काही घडो

आज इस्रायलला रोखू शकेल अशी कोणतीही व्यवस्था जगात अस्तित्वात नाही. अमेरिका वगैरे देश तर इस्रायलला उघडपणे सैन्य व पैशांची मदत करीत आहेत. अरब देश किंवा इराणच्या पॅलेस्टिनी समर्थनाला किंमत उरलेली नाही. म्हणजेच वर्क फ्रॉम होमप्रमाणेच देशादेशातील संबंधांमध्ये लोकशाही तत्व अमलात आल्याचा निष्कर्षदेखील खोटाच असल्याचे या वर्षाने दाखवून दिले. एकविसाव्या शतकातील तंत्रक्रांतीचा फार गवगवा झाला होता. काही वर्षांपूर्वी ट्युनिशिया, इजिप्त, सीरिया इत्यादी काही देशांमध्ये जनतेचे अभिनव उठाव झाले. मोबाईल, संगणक इत्यादी साधनांमुळे ही जनता एकमेकांशी जोडली गेली होती. एकमेकांना ओळखत नसूनही आणि पंथ, प्रांत इत्यादी विभिन्न असूनही या जनतेमध्ये बंधुभाव तयार झाला व त्यांनी आपापल्या देशांमधल्या जुलमी सत्ता उलथून टाकल्या. या उठावांना ऑरेंज रेव्होल्यूशन इत्यादी नावे देण्यात आली. आता जगभरात असेच घडेल व हुकुमशाही नेत्यांना जरब बसेल अशी स्वप्ने बऱ्याच जणांना पडू लागली. पण या क्रांत्यांचा थोड्याच काळात बोजवारा उडाला. दुसरे म्हणजे जे तंत्रज्ञान ही जनता वापरू शकते तेच तंत्रज्ञान हुकुमशाही सत्ता व नेते अधिक प्रभावीपणे वापरू शकतात हेही दिसून आले. उलट आजच्या काळात असे झोंड नेतेच जनतेच्या मनांचा अधिकाधिक कबजा घेतात हे आता स्पष्ट होत आहे. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू ही याची ठळक उदाहरणे आहेत. ट्रम्प पुन्हा अध्यक्ष होण्याची जोरदार शक्यता आहे. भारतातही एकीकडे वैदिक काळाचा गौरव करणारे गोसावडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठमोठे दरबार भरवू लागले आहेत. बागेश्वर नावाचा एक बाबा लोकांच्या मनात काय आहे ते ओळखण्याचा दावा करतो आणि देवेंद्र फडणवीसांपासून ते कमलनाथांपर्यंत सर्व नेते त्याच्या पायी नतमस्तक होतात हे 2023 चे दृश्य आहे. असो. हे साल संपून नवीन काही घडो ही इच्छा.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

महाविकास आघाडीत जागावाटपावरुन रस्सीखेच

Next Post

अर्थव्यवस्थेचा पाया विस्तारतोय…

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर, तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना अद्याप एकही छदाम नाही

अर्थव्यवस्थेचा पाया विस्तारतोय...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?