पनवेल | प्रतिनिधी |
लॉकडाऊन काळामध्ये इतर व्यवसायप्रमाणे शिक्षण क्षेत्रात देखील मंदी आली. आजपर्यंत शाळा नियमितपणे सुरू झालेल्या नाहीत तरी देखील आरवाय एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आयेशा रणदिवे यांनी हिम्मत करून दोस्ती हेरिटेज प्लॉट नंबर 26,करंजाडे सेक्टर 4 येथे आरवाय एज्युकेअर लर्निंग सेंटर सुरु केले आह.पनवेल महापालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित राहून आयेशा रणदिवे व त्यांचा टीम ला शुभेच्छा दिल्या.
एज्युकेअर लर्निंग सेंटरमध्ये नर्सरी, सिनिअर केजी, पहिली ते पाचवी, पाचवी ते दहावी (स्टेट बोर्ड , सीबीएसइ , आयसीएसइ सेमी इंग्लिश) अकरावी ते बारावी (विज्ञान आणि वाणिज्य) आदींचे कोचिंग क्लासेस सुरू करण्यात येणार असल्याची माहीती अध्यक्षा आयेशा रणदिवे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रम सोहळ्यास उद्योजक इकबाल काझी,नगरसेवक मुकीत काझी, केवल महाडिक,करंजाडे पोलीस पाटील कुणाल लोंढे,पालकवर्ग व हितचिंतक उपस्थित होते.