गोट्या खेळाचा उत्साह कायम

मोबाईलच्या जगतामध्ये पारंपारिक खेळाला पसंती

| अलिबाग | प्रमोद जाधव |

गोट्यांचा खेळ हा पारंपारीक आहे. मोबाईलच्या जगतामध्ये हा खेळ कालबाह्य होण्याच्या मार्गावर होता. मात्र आजही गाव-वाड्यांमध्ये हा खेळ खेळला जात असून या खेळाला प्रचंड पसंती आहे. त्यामुळे या खेळाचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले आहे.

शाळेला सुट्टी पडल्यावर अथवा, शाळा सुटल्यावर अनेक गाव, वाड्यांमध्ये शाळकरी मुलांसह तरुण मंडळी गोट्यांचा खेळ खेळत होते. हा सांघिक खेळ असून या खेळाला यापूर्वी प्रचंड महत्व होते. या खेळातून एकाग्रता वाढीला चालना मिळते. पूर्वी गोट्यांचा खेळ गावागावात खेळला जात होता. परंतु, गेल्या काही वर्षापासून मोबाईलमधील ॲपवर वेगवेगळे खेळ येऊ लागले. त्यामुळे गोट्या खेळांऐवजी मोबाईलच्या खेळाला महत्व दिले जात होते. त्यामुळे हा खेळ कालबाह्य होण्याच्या मार्गावर होता. परंतु मोबाईलच्या जगतामध्ये वावरणारी तसेच घरबसल्या ऑनलाईन खेळ खेळणाऱ्या पिढीनेदेखील मैदानातील गोट्यांच्या खेळाला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील गावे, वाड्यांमध्ये गोट्यांचा खेळ आवडीने खेळला जात आहे. शाळेतील मुलांसह काही तरुण मंडळीदेखील या खेळामध्ये मग्न होत आहेत.

नेमबाजीसह एकाग्रता वाढीसाठी हा खेळ महत्वाचा मानला जातो. त्यामुळे या खेळाचा उत्साह मोबाईलच्या जगामध्ये आजही कायम टिकून असल्याचे खेळातून दिसून येत आहे.

Exit mobile version