लघु उद्योगांसाठी आता शासनाची मदत

। माणगाव । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही केंद्र पुरस्कृत योजना एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर राबविली जात आहे. सदर योजनेंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. सागरी उत्पादनामध्ये मत्स्य उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग, माशांपासून लोणचे बनवणे, सुकवलेले मासे, डबाबंद मासे, खारवलेले मासे, शीतगृह उभारणे, वाहतूक व विक्री व्यवस्था इत्यादी व्यवसायांसाठी अनुदान उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत बँक निगडीत प्रकल्पांना 35 टक्के अनुदान असून जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत अनुदान उपलब्ध केला जाणार आहे. तसेच या योजनेतून सागरी उत्पादने वगळून तालुक्यांमध्ये सद्यस्थितीत चालू असलेले कोणतेही अन्न प्रक्रिया उद्योग यामध्ये राईस मिल, पोहा मिल, काजूप्रक्रिया, पापड उद्योग, मसाला कांडप, नाचणी प्रक्रिया, फळप्रक्रिया, व इतर गृहउद्योग यांना 35 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी प्रक्रिया धारकांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव येथील प्रमोद शिंदे, राहुल जोशी अलिबाग, यांचे समवेत संपर्क करावे. या योजनेअंतर्गत माणगाव तालुक्यातील जास्तीत जास्त मत्स्य उत्पादक कोळंबी संवर्धन करणारे शेतकरी व इतर अन्न प्रक्रिया करणारे उद्योग यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान आर. डी. पवार तालुका कृषी अधिकारी माणगाव यांनी केले आहे.

Exit mobile version