सव्वा दोन कोटींच्या खर्चातून सोलार पॅनलची उभारणी
प्रतिदिन 312 किलोवॅट वीजनिर्मिती; लाखोंचे वीजदेयक वाचणार
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिका प्रशासनातर्फे सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पातून 312 किलोवॅट वीजनिर्मिती होणार असून, या विजेचा वापर पालिकेच्या मालकीच्या इमारती प्रकाशमान करण्यासाठी केला जाणार आहे.
पनवेल पालिका दरवर्षी वीजदेयकापोटी करोडो रुपयांचा खर्च करत असते. सौर ऊर्जेचा वापर करून या खर्चात कपात केली जाणे शक्य असल्याने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनातून पालिका प्रशासनाने शहरातील ड प्रभाग कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,पालिका मुख्याल्याजवळील अग्निशमन केंद्र, बंदर रोड येथील एचटीपी प्रकल्प आशा पाच ठिकाणी ग्रीड कनेक्टिव्ह रुफ टाफ सोलार पॅनल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाकरिता पालिकेतर्फे सवादोन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. विजेचा वाढता वापार आणि वीज उपकेंद्रांवरील ताणामुळे वीजपुरवठ्यात तफावत वाढली आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढल्यास ही तफावत दूर केली जाणे शक्य असल्याने वीजग्राहकांनी जास्तीतजास्त प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर करावा याकरिता सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे.
पनवेल पालिका प्रशासन वीज देयकापोटी दर महिना 50 लाख रुपयांच्या आसपास खर्च करते. सोलार ऊर्जा वापराच्या या पालिकेच्या निर्णयामुळे पालिकेचे महिन्याला जवळपास पाच लाख रूपये वाचणार असून, सोलार पॅनलकरिता पालिका प्रशासनकडून करण्यात आलेला खर्च पाच ते सहा वर्षांत भरून शक्य होणार असल्याचे मत पालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
ग्रिड कनेक्टेड सोलर रूफटॉप सिस्टम म्हणजे काय?
ग्रिड कनेक्टेड रूफटॉप किंवा छोट्या एसपीव्ही सिस्टीममध्ये, एसपीव्ही पॅनलमधून तयार होणारी डीसी ऊर्जा एनर्जी ऑप्टिमायझेशन युनिट (पॉवर कंडिशनिंग युनिट) वापरून एसी एनर्जीमध्ये रुपांतरित केली जाते आणि संस्था/व्यावसायिक प्रतिष्ठान किंवा निवासीमध्ये स्थापित केलेल्या सिस्टमच्या क्षमतेवर आधारित असते. परिसर. ग्रिडवर प्रदान केला जातो. या प्रणाली दिवसा ऊर्जा निर्माण करतात, ज्याचा उपयोग संपूर्ण कॅप्टिव्ह लोडला ऊर्जा देण्यासाठी आणि ग्रिड उपलब्ध असेपर्यंत ग्रिडला अतिरिक्त वीज पुरवण्यासाठी केला जातो.ढगांच्या आच्छादनामुळे सौर ऊर्जा पुरेशी नसलेल्या प्रकरणांमध्ये ग्रिडमधून ऊर्जा काढली जाते आणि कॅप्टिव्ह लोडला पुरवली जाते.