मढाली येथून शासकीय डोजर चोरीला

| कोलाड | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील मढाली गावाच्या हद्दीतील कुंडलिका उजव्या कालव्याच्या शेजारी शासकीय जागेत उभा ठेवलेला शासकीय डोजर कोणीतरी चोरून नेल्याची घटन घडली. मिळालेल्या माहितीनुसार पाटबंधारे खात्याचा अंदाजे 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचा पीवळ्या रंगाचा शासकीय सयंत्र शांतुई डोजर क्र.102461 हा गेल्या 5 वर्षांपासून बंद अवस्थेत होता. तो कोणीतरी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, याचा अधिक तपास सपोनि बी.बी. फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एस.जी. भोजकर करीत आहेत.

Exit mobile version