| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुडमध्ये राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्या दिर्घकाळ प्रलंबित असलेल्या रास्त मागण्यांबाबत सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान सरकारी-निमसरकारी, जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपालिका व ग्रामपंचायत कंत्राटी कर्मचारी समितीचे मुरुड तालुका अध्यक्ष संतोष कचरे यांनी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांनी तयार केलेले निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे. सांप्रत सरकारने संवेदनशीलता दाखवून प्रलंबित मागण्यांबाबत त्वरीत सकारात्मक ठोस निर्णय घेऊन कर्मचारी-शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राज्यभरातील 17 लाख सरकारी कर्मचारी-शिक्षक, गेले वर्षभराहून अधिक कालावधीत, शासनाकडून प्रलंबित मागण्यां संबंधात न्याय मिळेल या प्रतिक्षेत होते. या करीता विविध आंदोलनात्मक कृती करुन रास्त प्रलंबित मागण्यांकडे शासनाचा लक्षवेध करण्यासाठी लोकशाही पध्दतीने प्रयत्न केले. मात्र, कर्मचारी संघटनेस कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तसेच, शासनाने अद्यापपर्यंत ठोस निर्णय घेतला नाही. संघटनेने या बाबत दि. 17 मार्च रोजी सध्याच्या कर्मचारी-शिक्षकांच्या संतप्त भावना कळविल्या असुन संपाची रितसर नोटीस सादर केली आहे.
मुरुडमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
