५४ चिनी अ‍ॅप्सवर भारत सरकारकडून पुन्हा बंदी

। मुंबई । वृत्तसंस्था ।
केंद्र सरकारने ५४ हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे ताजे आदेश जारी केले आहेत. या अँप्सपासून भारतीयांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका आहे, असे हा निर्णय जारी करताना अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, यापैकी बरेच अँप्स Tencent, Alibaba आणि गेमिंग फर्म NetEase सारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत आणि २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या अँप्सचे नामांतर केलेले किंवा दुसऱ्या ब्रँडच्या नावाखाली नव्याने लाँच केलेले आहेत.
ईकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे अँप्स चीनसारख्या परदेशातील सर्व्हरवर भारतीयांचा संवेदनशील डेटा ट्रान्सफर करत असल्याच्या कारणावरून इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ताज्या बंदी आदेश जारी केला. गुगलच्या प्ले स्टोअरसह टॉपअँप स्टोअरनाही हे अँप्प्लिकेशन ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्ले स्टोअरवर भारतात ५४ अँप्स आधीच ब्लॉक करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी Meity ने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९ अ अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर केला आहे.

बंदी घालण्यात आलेल्या अँप्सची यादी
Sweet Selfie HD, Beauty Camera, Selfie Camera, Equalizer, Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2: Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena, AppLock and Dual Space Lite या अँप्सवर बंदी घालण्याची घोषणा सरकारने केली आहे.

Exit mobile version