| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांचे संदर्भात ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पदाधिकार्यांनी नुकतीच खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांची ठाणे येथे भेट घेतली. या मागण्यांमध्ये रेल्वे प्रवास भाडे सवलत पूर्ववत् सुरु करावी. आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 (व नियम 2010) हा कायदा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने दुरुस्ती/सुधारणेसह स्थायी समिती संसदेत पटलावर ठेवणार आहे. संसदेच्या चालू अधिवेशनात तो मंजूर व्हावा. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री यांचेबरोबर त्यांच्या दालनात बैठक आयोजित करावी. या मागण्यांचा समावेश होता. यावर शिंदे यांनी मुद्दा क्र. 1 व 2 संसदेत उपस्थित करतो असे सांगून हिवाळी अधिवेशनानंतर मा.मुख्यमंत्री यांचेसोबत बैठक घेऊ असेही सांगितले. लवकरच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासंबंधीची एक नवी योजना कार्यान्वित होणार आहे असेही ते म्हणाले.
या भेटीचे वेळी अण्णासाहेब टेकाडे, विवेक देशपांडे, श्या.गो.पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते. खा.डॉ. शिंदे यांनी ज्येष्ठांबद्दल दाखविलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाबद्दल अण्णासाहेब टेकाळे यांनी त्यांचे आभार मानले.