शिक्षकांच्या कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करणार

| मुंबई | प्रतिनिधी |
शिक्षकांच्या कंत्राटी भरतीवरून राज्यभरात गदारोळ झाल्यानंतर आता अखेर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करणार असल्याची घोषणा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कंत्राटी भरतीवरून युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आता आम्ही अशी भरती रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Exit mobile version