शैक्षणिक कर्जाची रक्कम हडप; स्टेट बँकेतील प्रकार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

श्रीबाग येथील स्टेट बँकेच्या शाखेतून शैक्षणिक कर्जाची 2 लाख 85 हजाराची रक्कम परस्पर आपल्या खात्यात वर्ग करुन पैशांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

स्टेट बँकेत आरोपीने बँकेचे वरिष्ठ अधिकारी असताना देखील एका महिलेला पी.जी.डिप्लोमा इन डाटा सायन्सच्या शिक्षणाकरिता 2,85,000/- रूपयाचे शैक्षणीक कर्ज मंजुर केले. मात्र, सदरची रक्कम शिक्षण संस्थेकडे न जमा करता ती रक्कम सदर महिलेच्या बँक खात्यात जमा करून त्यानंतर त्यांनी सदर महिलेस ती रक्कम त्यांचे शाखेतील सफाई कामगार साक्षीदार यांचे बँक खात्यात जमा करायला लावली. त्यानंतर साक्षीदार यांच्या खात्यातून सदरची रक्कम स्वत:चे खात्यात वर्ग करुन घेत, संगणमत करुन सदर रक्कमेचा अपहार करुन बॅकेची फसवणुक केली. अधिक तपास पोसई श्री.अभिजित पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version