। अलिबाग । वार्ताहर ।
9 आरोपींनी मिळून नागाव येथील महिलेची खोटे खरेदीखत बनवून फसवणूक केली असून त्यांची जागा हडप केल्याची घटना घडली आहे. दि.2 मार्च 2001 ते 28 ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान क्र.0 1 रा.गंगासागर कोऑसो, उमरखाडी रोड, मुंबई व सोबतचे 8 आरोपी यांनी मिळून नागाव येथे राहणार्या महिला फिर्यादी यांच्या पतीच्या खोटया सह्या करून खोटे व बनावट अखत्यारपत्र व खरेदीखत तयार करुन फिर्यादी यांची जागा मयत यांना विकली तसेच खोटे व बनावट अखत्यारपत्र व खरेदीखत तयार करताना आरोपीत क्र.2,3 व 4 यांनी फिर्यादी यांच्या पती सोबत ओळख नसताना ओळख देणार म्हणून सहया केल्या व आरोपी क्र.5, 6 यांनी साक्षीदार म्हणुन सहया केल्या तसेच आरोपी क्र.7 व 8 यांनी वारस म्हणून सह्या केल्या. तर आरोपी क्र. 9 याने सदर अखत्यारपञ व खरेदीखत खोटे आहेत हे माहीत असताना देखील त्यांनी तलाठी सजा नागाव येथे वारसदार म्हणुन त्यांचे नाव दिले आहे. व अखत्यारपत्र आणि खरेदीखत हे खोटे असतानादेखील खरे आहेत असे भासवून फिर्यादी यांची फसवणुक केली. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई/श्री.पाटील हे करीत आहे.