| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या, कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात शनिवारी (दि. 16) मुंबई विद्यापीठ पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी सन 2022-23 या वर्षांत बीए, बीकॉम, बीएससी. आणी एमकॉम. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रा. डॉ. निलेश चव्हाण यांनी केले. तर, अतिथींचा परिचय, प्रा. पंकज गमे यांनी करुन दिला. या पदवीदान समारंभ प्रसंगी मुख्य अतिथी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सीडीसी सदस्य यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी नंतरच्या भावी जीवनासाठी मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच पदवी प्राप्त अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी महाविद्यालय व आपल्या गुरुजनांप्रती भावपूर्ण असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्व. गोपीनाथ मुंडे महाविदयालय मंडणगड, येथील महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रो. डॉ. जाधव तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, नितीन सुर्वे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्रा. किशोर लहारे व आयक्यु एसी प्रमुख डॉ वाल्मिक जोंधळे व सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होता. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.श्रीनिवास जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, अर्थशास्त्र विभागाच्या प्रा.दिपाली पाठराबे व प्रा. नवज्योत जावळेकर यांनी केले. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी व काही पालकही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे गोखले संस्थेचे वरीष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.