। नवीन पनवेल । वार्ताहर ।
शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई येथील प्राचार्या डॉ. मसरत अली उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लेझीम नृत्य, तारपा नृत्याने केले गेले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. नीलीमा अरविंद मोरे यांनी केले.
याप्रसंगी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुविद्या महेश सरवणकरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे काय? हे समजावून सांगितले. शेवटी पदवीसाठी उपस्थित राहिलेल्या छात्राध्यापकांकडून शपथ घेतली गेली. प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी ठेवावा, असे आवाहन केले. याप्रसंगी शैक्षणिक वर्ष 2019-21 च्या बी.एड आणि एम एडच्या छात्राध्यापकांनी पदवी घेण्यासाठी उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा हेलवाडे यांनी, तर आभारप्रदर्शन प्रा. बिजली दडपे यांनी केले. या कार्यक्रमाची जबाबदारी डॉ. नीलीमा अरविंद मोरे यांनी स्वीकारली.