‘कोकण ज्ञानपीठ’चा पदवी प्रदान समारंभ

| नेरळ | प्रतिनिधी |

कोकण ज्ञानपीठ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन अथक प्रयत्न करून आपापले कौशल्य दाखवीत 2022-23 च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कोकण ज्ञानपीठ कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. विलास पिल्लेवान यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवी प्रदान सोहळ्याचे आयोजन कॉलेजच्या सेमिनार हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गौतम भट्टाचार्य यांची उपस्थिती होती. यावेळी एकूण 190 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून, 160 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रासह पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी कॉम्प्युटर इंजिनियरिंगच्या 71, मॅकेनिकल इंजिनिअरींगच्या 53, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशनच्या चार आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 62 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात प्रथम आलेले आनंद पानमंद, दिव्या रौले, अदिती सिंग, मॅकेनिकल इंजिनिअरींग विभागात प्रथम क्रमांक मयूर पवार, द्वितीय क्रमांक देवेश पोकळे, द्वितीय क्रमांक साहिल निकम, तृतीय क्रमांक किरण कालेकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या मनीष वाजगे, पौर्णिमा मोकल, यश राजेंद्र, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात प्रथम क्रमांक मेघराज लोट, द्वितीय क्रमांक मंगेश उभरे, तृतीय क्रमांक किरण शिंदे, तृतीय क्रमांक कृतिका खराट आदी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे गौतम भट्टाचार्य, सिनियर प्राचार्य आर्किटेक्ट जेन पॅक्ट इंडिया लिमिटेड, झुलकरनैन दाभिया, डॉ. विलास पिल्लेवान, प्राचार्य कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रो. संजय पाटील, विभागप्रमुख कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, प्रो. अनुप कुंटे, विभागप्रमुख इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, प्रो. प्रवीण देशपांडे, विभागप्रमुख मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रो. गिरीश दाखवे, विभागप्रमुख इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन,प्रो. दिपाली केसकर सायन्स अँड ह्युमॅनीटी आदींसह सुनील लाड, अनिल घरत, संदेश गावंड, किरण पाटील, सचिन लाड आदी मान्यवर उपस्थित होते. पदवीदान समरंभाचे सूत्रसंचालन प्रा. दुराज तिवाले यांनी केले.

Exit mobile version