। नेरळ । प्रतिनिधी ।
विश्व हिंदू परिषदेचा उपक्रम असलेल्या नेरळ गावातील विद्या विकास मंदिर शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, हिंदू सणांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
या स्नेहसंमेलनात प्राथमिक विभागातील पहिली ते सातवीमधील विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले. त्यात गुढी पाडव्याचा सण, राम सिया राम, ए जो केसरी के लाल, लोहरी आयी, दिंडी चालली, ओमकार स्वरुपा, नागोबाला पाहू, मंगळागौर सण, सण आयलाय गो नारळी पुनवेचा, कृष्ण जन्मला ग, गोविंदा रे गोपाळा, मातृदिन, डम डम डम डमरू वाजे, नवीन वर्ष शुभारंभ, मार्तंडय कन्या रिमिक्स, आली दिवाळी आली, निराकार गुरू, हे कथा संग्राम की, ढील दे ढील दे, मंगलमूर्ती मोरया, होलिका दहन आणि लय भारी या गीतांवर विद्यार्थी थिरकले. तसेच, पर्यावरण दिनावर आधारित नाटिका यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
यावेळी, मंडळाचे उपाध्यक्ष बल्लाळ जोशी, कार्यवाह अमित जोगळेकर, बाळकृष्ण पादीर, वासुदेव पिंपूटकर, मनोहर हर्डीकर, अंकुश मोरे, आसावरी काळे, अनिल बदले, दिलीप कवाडकर, आनंद काळे, अंकुश मोरे, मुख्याध्यापिका शैलजा निकम, स्वाती तूपगावकर, स्नेहा म्हसे, जयेंद्र दुर्गे, सविता गायकर, अनया पटवर्धन, मनीषा हजारे, रचना दुर्गे, सोनाली भंडारे, नेहा वेहले, सौरभ कारुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.