| तळा | वार्ताहर |
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा येथे शनिवारी (दि.16) पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांजल झा उपस्थित होते. यावेळी सर्व पदवी व पदवीधर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यापूर्वी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पदवी स्नातक विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात धृव राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के, संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, संस्थेचे सचिव मंगेश देशमुख, प्राथमिक विभागाचे चेअरमन किरण देशमुख, प्र. म. जोशी प्रशाला पन्हेळी गायमुखचे चेअरमन श्रीराम कजबजे, कार्यकारी मंडळाचे सदस्य दिपक कोटीया, संस्थेचे सदस्य चंद्रकांत खातू आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन प्रा. भरत चाळके यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार डॉ. राजाराम थोरात यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.