ग्रामपंचायत पोटनिवडणूक: साडेतीन वाजेपर्यंत 58.57 टक्के मतदान

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, कर्जत, खालापूर, माणगाव, रोहा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यातील जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पाच आणि सदस्यपदाच्या 30 अशा एकूण 35 रिक्त जागांसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 58. 57 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील वैजाळीमध्ये 55.76 टक्के, नागावमध्ये 59.49 टक्के, खंडाळेमध्ये 60.60 टक्के, एकदरामध्ये 64.33 टक्के, काशीदमध्ये 79.91 टक्के, मांडलामध्ये 61.37 टक्के, पाली तर्फे कोतल खलाटीमध्ये 63.44 टक्के, होराळेमध्ये 74.57 टक्के, वणी मलई कोंडमध्ये 44.44 टक्के, पूईमध्ये 51.65 टक्के, मोहोप्रेमध्ये 63.95 टक्के, ताम्हाणेमध्ये 66.44 टक्के, वराठीमध्ये 36.13 टक्के, महालगूरमध्ये 69.08 टक्के, तुर्भे बुद्रूकमध्ये 56.29 टक्के, घोणसेमध्ये 43.56 टक्के, दिवेआगरमध्ये 52.28 टक्के आणि बागमांडलामध्ये 5897 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सर्वात जास्त मतदान काशीद, एकदरा, ताम्हाणे, महालगूर येथे झाले असून सर्वात कमी मतदान घोणसे, वणीमलई कोंड येथे झाल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version