ग्रामपंचायत निवडणूक: पेण तालुक्यात शेकापने खाते उघडले

मुंढाणीत सरपंचपदासह पाच सदस्य बिनविरोध

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यात 26 ग्रामपंचायतीच्या निवडणूका येत्या 18 तारखेला होणार आहेत. परंतू आज छानणीच्या वेळेस ग्रामपंचायत मुंढाणीमध्ये सरपंचासह 5 सदस्य बिनविरोध निवडून शेतकरी कामगार पक्षाने निवडणूकीच्या आगोदरच आपले खाते उघडले आहे.

शिहू विभागातील प्रतिष्ठेची समजल्या जाणार्‍या मुंढाणी ग्रामपंचायतीमध्ये युवा नेते प्रसाद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली थेट सरपंच सावित्री अरविंद शेळके या बिनविरोध निवडून आल्या असून 7 सदस्यांपैकी 5 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर, 2 सदस्यांच्या जागा जातप्रमाणपत्र नसल्याने रिक्त आहेत. या सदस्यांमध्ये जनार्दन खंडू भोईर, जगदीश खंडू भोईर, संगीता दिनेश भोईर, पूजा विनोद कोकाटे यांचा समावेश आहे.

पेण येथील पक्ष कार्यालयात माजी आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना पुष्पहार घालून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा नेते प्रसाद भोईर, माजी सभापती संजय भोईर, कृउबाचे माजी उपसभापती प्रफुल्ल म्हात्रे, रामदास घासे, विश्‍वनाथ कोठेकर, भाऊ कदम, कमलाकर मोकल, शरद पाटील, कार्यालयीन चिटणीस संदेश ठाकुर अदींसह मुंढाणी ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version