| आपटा | वार्ताहर |
रसायनी, पाताळगंगा, आपटा, मोहोपाडा व इतर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा नेहमीच तहकूब होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायती मधील सत्ताधारी मनाला येईल ते सर्व इतिवृत्त लिहून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत आपटा ग्रामपंचायत व कालची मोहोपाडा ग्रामपंचायत या पुढील वर्षी जनतेच्या हितासाठी व गावातील विकास यासाठी ग्रामसभा बोलावली होती. पण चुकीच्या पद्धतीने बोलवण्यामुळे ग्रामस्थ सभेस येत नाहीत. याचाच फायदा सत्ताधारी घेताना दिसतात याबाबतही नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा का होत नाहीत याची गंभीर दखल जिल्हा परिषदेने घेणे गरजेचे आहे. ग्रामसभा झाली तर अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षाही ग्रामस्थांची आहे.