| मुंबई | वृत्तसंस्था ।
क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली भारत-पाकिस्तानची मॅच दि.14 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यासाठी जगभरातून सुमारे 1 लाखाहून अधिक क्रिकेटशौकीन येणार आहेत. त्यामुळे दि.13 पासूनच अहमदाबादकडे येणाऱ्या सर्व रेल्वे, विमाने व खासगी ट्रॅव्हल्स फुल्ल झाल्या आहेत. एरवी रिकामी धावणारी मुंबई-तेजस एक्स्प्रेसही फुल्ल झाली आहे. दिल्लीहून येणाऱ्या सर्व गाड्यांमध्येही अशीच स्थिती आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 2 ते 3 विशेष गाड्या चालवण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. जयपूर ते अहमदाबाद रेल्वेतही वेटिंगची संख्या वाढत आहे. त्यामुळे जयपूर-अहमदाबा ददरम्यान खास वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी सुरू आहे.
अहमदाबादेत क्रिकेटचे घमासान

oplus_1024