| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेवर गेली दोन दिवस मेगा ब्लॉक आहे. यादरम्यान, अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही लोकल नेरळ येथून पुन्हा परत पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे खोपोलीपासून भिवपुरीपर्यंतचे प्रवासी नेरळ येथे पोहचले आहेत. त्यांच्याकडून आणण्यात आलेल्या वाहनांनी नेरळमधील रेल्वेची पार्किंग फुल्ल झाली असून सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
नेरळ ते कर्जत पुढे खोपोलीपर्यंतची लोकसेवा बंद असल्यामुळे नेरळमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. नेरळ ते कर्जत लोकल सेवा बंद असल्यामुळे खोपोली येथून नोकरदार वर्ग नेरळ स्टेशन वर येण्यासाठी पोहचत आहे. कर्जत स्थानकाच्या यार्डचे अभियांत्रिकी कामासाठी दोन दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. नेरळ ते कर्जत पुढे खोपोली या रेल्वे मेगाब्लॉक असल्याने शनिवारी (दि.11) नेरळ शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. कर्जत आणि भिवपुरी रोड स्टेशन या दोन स्थानकावरून मोठ्या प्रमाणात चाकरमानी नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, ठाणे आणि मुंबई या शहराच्या ठिकाणी जात असतात. मात्र, या चाकरमान्यांना कर्जतवरून तसेच भरपूर रोड स्टेशन या दोन स्टेशनवरून लोकल पकडावी लागते. त्यानंतर हे चाकरमानी आपल्या कामासाठी त्या शहरांमध्ये जाऊन पोहचत आहेत. त्यामुळे नेरळ गावात तसेच परिसरात आणि बाजार पेठेत व्हननेच वाहने दिसून येत आहेत.





