। चौल । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथे रविवारी (दि.23) चौलमळा प्रीमियर लीगचे गावचे प्रमुख रवींद्र घरत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले. गतवर्षीच्या यशस्वी आयोजनानंतर या क्रिकेट स्पर्धेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. चौलमळा क्रिकेट संघातील खेळाडूंच्या संकल्पनेतून ही स्पर्धा चौल-मिठाघर येथील मैदानावर खेळविण्यात येत आहे. गावातील तरुण पिढीमध्ये एकोपा व एकमेकांबद्दल जिव्हाळा राहावा, हीच या स्पर्धेमागची भावना आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी चौलमळा गावचे उपप्रमुख जितेंद्र पाटील, कृष्णादेवी युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक, भजन मंडळाचे अध्यक्ष तथा युवक मंडळ उपाध्यक्ष अल्पेश म्हात्रे, भजन मंडळ उपाध्यक्ष अंजेश घरत, महिला मंडळ अध्यक्षा प्रमिता पाटील, माजी सरपंच वामन घरत, प्रभाकर नाईक, विलास शिवलकर, सुनील घरत, रवींद्र नाईक, शालिनी नाईक यांच्यासह प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक चौलमळा क्रिकेट संघाचे अनिकेत म्हात्रे, जयेंद्र म्हात्रे, ओमकार पाटील, प्रणव पाटील, विशाल घरत, चिन्मय घरत, अभिषेक घरत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सहकारी मेहनत घेत आहेत.