नगरविकास विभागाकडून कर्जत नगरपालिकेला अनुदान

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील विविध विकासकामे यांच्यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून तब्बल साडे आठ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पालिका हद्दीमधील सात विकासकामे यांच्यासाठी नगरविकास विभागाने विशेष रस्ता अनुदान मधील साडेसहा कोटींचा निधी मंजूर असून वैशिट्यपूर्ण योजना अंतर्गत तीन विकासकामे यांच्यासाठी दोन कोटी दहा लाखाचा निधी मंजूर आहे.


कर्जत नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी शहरातील विकासकामे यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी काही महिन्यापूर्वी शहरातील विकासकामे यांच्यासाठी वैशिट्यपूर्ण योजनेमधून आणि विशेष रस्ता अनुदानमधून निधी मिळावा अशी मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्या सर्व विकासकामे यांच्यासाठी निधी मिळावा म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाचे खा.श्रीरंग बारणे आणि स्थानिक आ.महेंद्र थोरवे यांनी नगरविकास मंत्री यांच्याकडे निधी देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. नगरविकास विभागाने कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कर्जत शहरातील विविध नऊ विकासकामे यांच्यासाठी तब्बल आठ कोटी साठ लाखाचा निधी मंजूर केला आहे.

नगरविकास विभागाच्या विशेष रस्ता अनुदानमधून कर्जत शहरात प्रभाग नऊ मधील रोहिदासनगर ते उद्यम नगर रस्ता तसेच गटार बांधकाम करण्यासाठी तीन कोटी निधी मंजूर आहे तर प्रभाग चार मधील आकुर्ले भागातील अंतर्गत रस्ता तसेच गटार बांधकाम करण्यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचवेळी त्याच भागातील कोंदिवडे मुख्य रस्ता पासून गोडबोले घरापर्यंत रस्ता आणि गटार बनविण्यासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर असून जुने एसटी स्टॅन्ड ते सयाजी गायकवाड घरापर्यंत रस्ता बनविण्यासाठी 50 लाखाचा निधी मंजूर आहे. त्याच प्रभागात संतोष आंबेकर ते दिनेश साविते यांच्या घरापर्यंत रस्ता बांधण्यासाठी 50 लाखाचा निधी मंजूर आहे, तर दहिकवाली भागातील मेढी घर ते कॉसमॉस बिल्डिंग येथील रस्ता तसेच गटार बांधकाम करण्यासाठी 50 लाखाचा निधी मंजूर केला आहे. हि कामे विशेष रस्ता अनुदानमधून केली जाणार असून नगरविकास विभागाने या कामांसाठी सहा कोटी 10 लाखाचा निधी मंजूर आहे.

Exit mobile version