| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून नगरविकास विभागाकडून 20कोटींचा निधीचे प्रस्ताव सादर केले होते. राज्य सरकार मधील नगरविकास विभाग सांभाळणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.कर्जत नगरपरिषद, खोपोली नगरपरिषद आणि खालापूर नगरपंचायत साठी हा निधी मंजूर झाला आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन साठी कर्जत,खोपोली नगरपरिषद चे बाळासाहेबांची शिवसेना पक्ष पदाधिकारी हे नागपूर येथे पोहचले आहेत.त्याचबरोबर खालापूर नगरपंचायत चे पदाधिकारी देखील नागपूर येथे असून त्यांनी आपल्या शहरातील विकास कामांचे प्रस्ताव कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांना त्यांची आमदार निवासात भेट घेवून सादर केले होते.त्यानंतर आमदार थोरवे यांनी खोपोली,कर्जत नगरपरिषद आणि खालापूर नगर पंचायत मधील पदाधिकारी यांच्यसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली.त्यावेळी आमदार थोरवे यांनी मागणी केलेल्या सर्व 20 कोटी रुपयांच्या विकास कामांना नगरविकास विभागाकडून मान्यता देण्यात आली.
नगरविकास विभागाने खालापूर नगरपंचायत मधील विकास कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.तर कर्जत आणि खोपोली नगरपरिषद मधील विकास कामांसाठी 10कोटींचा निधी मंजूर केला आहे.त्या निधी मधून शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे तसेच गटारे,गार्डन विकसित करणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, वाचनालय उभारणे या कामांना निधी मंजूर केला आहे.या सर्व कामांना मंजुरी मिळाल्याने खालापूर सारख्या लहान नगरपंचायत मधील विकास कामांना चालना मिळणार आहे.तर कर्जत आणि खोपोली शहरातील अनेक महत्वाची कामे नगरविकास विभागाच्या निधी मधून होणार असल्याने पायाभूत सुविधा यांचा विकास होणार आहे.