स्वातंत्र्यसेनानीप्रति बँक ऑफ महाराष्ट्रकडून कृतज्ञता

| पनवेल | वार्ताहर |

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्राने आपले सन्माननीय स्वातंत्र्यसेनानी खातेदारांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची भारतभर मोहीम राबवित आहे. याच अनुषंगाने नवी मुंबई झोनच्या अंतर्गत नवीन पनवेल शाखेने त्यांचे स्वातंत्र्यसेनानी कुटुंबीय ग्राहक मैनाबाई दीक्षित यांचा मोठ्या सन्मानाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन आदर सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली व आशीर्वाद घेतला.

बँक ऑफ महाराष्ट्र स्वातंत्र्य सेनानींनी केलेल्या त्यागाचे मोल जाणून आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या भारतभर शाखांमधील स्वातंत्र्यसेनानींचा खातेदार व त्यांच्या कुटुंबियांप्रति त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करीत आहे. याच अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र नवी मुंबई झोन मध्ये झोनल मॅनेजर संजयकुमार चौरासिया, उप झोनल मॅनेजर सौरभ सिंग, मुख्य प्रबंधक संगिता देसाई व बी.डी.ओ. प्रसेनजीत अंकुश यांच्या मार्गदर्शनखाली नवीन पनवेल शाखेने त्यांचे स्वतंत्र सेनानी कुटुंबीय ग्राहक श्रीमती मैनाबाई दीक्षित यांचा मोठ्या सन्मानाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन आदर सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली व आशीर्वाद घेतला. याप्रसंगी त्यांच्या मुलगी आशा सुदामराव दीक्षित व नातू दर्शन हसमुख दीक्षितसुद्धा उपस्थित होते. दीक्षित कुटुंबीयांनीसुद्धा बँकेने सत्कार केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रचे आभार मानले व बँकेने दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नावीन्यपूर्ण उपक्रम बँक राबवित असल्याबद्दल बँकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version