| चिरनेर | प्रतिनिधी |
नवरात्र उत्सवातून प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत व्हावा, त्याचबरोबर स्त्रीशक्तीच्या अस्मितेचा सन्मान व्हावा, एकोपा वाढावा या दृष्टिकोनातून अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ चिरनेर प्रणित सार्वजनिक नवरात्र मंडळाच्यावतीने दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. दरम्यान, नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळेवर शुक्रवारी (दि.26) रात्री चिरनेरच्या सात कोहिनूर गायकांच्या गायन क्षेत्रातील गुणांचा महासन्मान करण्यात आला. यामध्ये मोहन फुंडेकर, विवेक केणी, समाधान फोफेरकर, विशाल पाटील, सुरज पाटील, आकाश गोंधळी व कमळाकर केणी या नामवंत गायकांचा समावेश आहे. त्यांना सरपंच भास्कर मोकल, तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी व माजी उपसरपंच सचिन घबाडी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सल्लागार तथा प्रसिद्ध निवेदक राजेंद्र भगत यांनी केले. तसेच, दोन्ही आवाजातून रसिकांना गायनाचा आनंद देणाऱ्या मोहन फुंडेकर या गायकाचे मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात आले.







