। पाली । वार्ताहर ।
कोरोना संकटकाळात अनेक व्यवसाय व उद्योग डबघाईला आले होते. मात्र, या संकटकाळात संधी शोधून महाड येथील दोन महिलांनी लघुउद्योग सुरु केला होता. आणि बघताबघता साबण, जेल व क्रीमचा ‘अॅलोर्वेदा ब्रँड’ विकसित केला. त्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. महाड येथील पूजा खेडेकर व सुप्रिया स्वामी यांनी कोणताही व्यवसायिक अनुभव नसताना स्वतःचा एक ब्रँड उभा करून मोठी झेप घेतली आहे. सुरवातीला 4 ते 5 प्रकारचे उत्पन्न घेत होते. मात्र, आता 55 प्रकारचे उत्पन्न त्या घेत आहेत. यामध्ये 14 प्रकारचे साबण असून ग्राहकांच्या मागणीनुसार बनवून दिला जातो. त्यांच्या या कार्याबद्दल दोघींनाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. व्यवसायाच्या वर्षपूर्तीला युनाइटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने सन्मानित करण्यात आले. पूजा खेडेकर यांना शुक्रवारी (दि.4) महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडून ‘उत्कृष्ठ महिला उद्योजिका’ हा पुरस्कार मिळाला आहे. याआधी देखील दोघींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.







