| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा वेश्वी-गोंधळपाडा शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन केले. तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक २२ व २३ नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रिडा संकुल नेहुली येथे नुकत्याच पार पडल्या. यामध्ये पीएनपीच्या मुले आणि मुली यांनी नेत्रदीपक कामगिरी केली.
मुले १४ वर्षाखालील गटामध्ये मतीन मच्छीन्द्र जंगम लांब उडीमध्ये तृतीय क्रमांक, १७ वर्षाखालील गटामध्ये श्रीराज चंद्रकांत पाटील गोळा फेकमध्ये प्रथम क्रमांक, भाला फेकमध्ये प्रथम क्रमांक, उंच उडीमध्ये द्वितीय क्रमांक, प्रसन्न प्रपेश पवार २०० मीटर धावणेमध्ये प्रथम व लांब उडीमध्ये चतुर्थ क्रमांक तर १४ वर्षाखालील मुली आर्या राजेंद्र बावकर १०० मीटर धावणे व २०० मीटर धावणेमध्ये अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक, १७ वर्षाखालील मुली पायल टिकमसिंग धनगर ३००० मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक, अनन्या अशोककुमार निर्मल उंच उडीमध्ये द्वितीय क्रमांक, धनश्री पांडुरंग जरांगे उंच उडीमध्ये तृतीय क्रमांक या सर्व स्पर्धकांची जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेकरीता निवड करण्यात आली आहे.
अलिबाग तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील गटातील मुले वजनी गट ५७ किलो गटामध्ये स्मित निलेश भगत द्वितीय क्रमां, १७ वर्षाखालील मुले वजनी गट ४१ ते ४५ किलो संचित संतोष गायकवाड कुस्ती स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाने विजेते ठरले. सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, मुख्याध्यापक निलेश मगर, क्रिडा प्रशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.