जिल्ह्यात 22 सप्टेंबरपर्यंत ग्रीन अलर्ट

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यामध्ये ऐन सणासुदीत पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. जिल्ह्यात गेली अनेक दिवसांपासून पाऊस सतत पडत आहे. गणेशोत्सवाची धुम सध्या सुरु आहे. मात्र पावसाने जोर धरल्याने गणेशभक्तांच्या आनंदावर विरजन पडू लागले आहे. नवनवीन कपडे परिधान करून देखील गणरायाच्या दर्शनासाठी बाहेर पडू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 20 सप्टेंबर रोजी दिवसभर पाऊस सुरुच राहिला. रात्री पावसाने जोर धरल्याने अनेकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता आला नाही. 22 सप्टेंबरपर्यंत ग्रीन अर्लट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडांसह रिमझीम पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Exit mobile version