| रसायनी | वार्ताहर |
चौक तुपगाव येथे आरोपी तेजस हनुमंत गुरव (34) रा. तुपगाव, पो. चौक यांनी आरोपी व मयत हे एकाच गावातील रहिवासी असून, आरोपी हा मयतासारखाच दिसत असे, त्यामुळे गावातील लोक त्याला चिडवत असायचे की, आरोपी तेजस हनुमंत गुरव हा मयत मनोहर लक्ष्मण कुंभार (साळवी) याचाच मुलगा आहे, त्यामुळे व मयत याचे आरोपीत याचे आईशी अनैतिक संबंध असण्याच्या संशयावरुन मयत याच्याबद्दल आरोपीच्या मनात राग होता. त्यामुळे दि. 03.06.2018 रोजी सकाळी 08.45 वा. चे सुमारास महेश परिट यांच्या फार्म हाऊसवर काम करण्यास गेले असताना आरोपीने मयताचे डोके शौचालयाजवळील सिमेंट कटड्यावर आपटून त्याच्या हातातील चाकूने गळ्यावर, छातीवर, पोटावर व इतर ठिकाणी वार करुन, भोसकून मयत याचा खुनाच्या हत्याकांडातील आरोपीला दोषी धरून आजन्म करावास आणि एक लाख रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्याची सुनावणी मा. अति. सत्र न्यायाधीश 1, जे. डी. वडणे सोो. यांचे न्यायालयात झाली. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, ॲड. आर. ई. येरूणकर यांनी एकुण साक्षीदारांची साक्ष नोंदविली. सदर केसमध्ये फिर्यादी, डॉ. शहा व डॉ. वानखेडे आणि तपासिक अंमलदार पोलीस निरिक्षक विश्वजीत काइंगडे व जीमल शेख खालापूर पोलीस ठाणे यांचा तपास महत्वाचा ठरला तसेच पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील पानसरे व पो.शि. दिक्षा राठोड यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, ॲड. आर. ई. येरूणकर यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद आणि दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तेजस हनुमत गुरव,याला दोषी धरून आजन्म करावास आणि एक लाख रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.