| रसायनी | वार्ताहर |
नवी मुंबई महानगर पालिका पूर्ण क्षेत्रातील व पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील खारघर व कामोठे विभागांना पाणीपुरवठा करणारे चौक येथील मोरबे धरणाचा जलाशय साठा पूर्ण झाल्याने नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते व माजी मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत जलपूजन पार पडले.
संपूर्ण नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र व पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील खारघर आणि कामोठे विभागांना पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आहे. गेले काही दिवस तुफान पावसामुळे धरण काठोकाठ भरले. पाणी साठवण्याची क्षमता 190.890 द.ल.घ.मी. इतकी असून, विसर्ग पाणी पातळी 88.00 मीटर इतकी आहे. पाणीसाठा पूर्ण झालेला आहे, त्यामुळे धरणाचे दोन्ही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे जादाचे पाणी मुळ धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले. नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी धरणातील पाण्याची शुक्रवार दि.30 रोजी विधिवत पूजा केली, पाणी पुरवठा कायमस्वरूपी राहण्यासाठी राज त्यांनी प्राथर्ना केली. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक उपस्थित होते. माजी मंत्री गणेश नाईक व उपस्थित अधिकारी यांनी मोरबे धरणातून सोडण्यात येणार्या पाण्याची आणि धरण परिसराची पाहणी केली. नवी मुंबई महानगर पालिका पाणी पुरवठा अधिकारी, अभियंता उपस्थित होते.