ग्रीन ग्रुपचा हरित संकल्प

| अलिबाग | प्रतिनिधी |

पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या ग्रीन अलिबाग ग्रुपच्यावतीने रविवारी (दि.) अलिबाग तालुक्यातील वेश्वी-कुरुळ येथील रसायनी टेकडी परिसरात वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम पार पडला. रामनाथ येथील अलिबाग नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून करंज, पिंपळ, आवळा व उंबर या देशी प्रजातींच्या 200 रोपांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी, निसर्गाशी त्यांचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच भविष्यात पर्यावरणाबाबत संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडावेत या उद्देशाने ग्रीन अलिबाग ग्रुपतर्फे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. याप्रसंगी रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे कार्यवाह आशिष पाटील हे उपस्थित राहून ग्रीन अलिबाग ग्रुपच्या पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

Exit mobile version