। माणगाव । प्रतिनिधी ।
पर्यावरण विषयक जाणीव व जागृती निर्माण व्हावी तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व, कचरा व्यवस्थापन याविषयी पर्यावरण गतीविधी (हरित मिलन) यांच्या माध्यमातून ईशा बाग भुवन येथे शुक्रवारी (दि.28) मार्च रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पर्यावरण गतिविधिचे रायगड जिल्हा संयोजक श्रीनिवास वारखंडकर, जिल्हा सहसंयोजक सुभाष अधिकारी, राजेश माटे, पर्यावरण गतिविधि रायगड जिल्हा संयोजक वैभव पडवळ, वनाधिकारी हरी बनसोडे, अजय परदेशी, आनंद सानप, सागर दहिबेंकर, ग्रामस्थ, महिला, तरुण व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी यावेळी पर्यावरण जतन संवर्धनासाठी करावयाचे उपक्रम, तसेच पर्यावरणाचे महत्त्व, कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व, वृक्ष लागवड व संवर्धन याविषयीची माहिती दिली. उन्हाळ्यामध्ये लागणार्या वनवांमुळे जैवविविधता नष्ट होत असून वणवे वेळीच रोखले जावेत यासाठी करावयाच्या उपाययोजना यांची माहिती दिली. या कार्यशाळेत उपस्थित सर्वांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला असुन अशा पद्धतीच्या कार्यशाळा गावोगावी झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमिनी व्यक्त केली आहे.