जेएनपीटीला हरित बंदराचा दर्जा

। उरण । वार्ताहर ।
उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) अनेक हरित प्रकल्प राबवीत असून देशातील बंदरासाठीच्या राबविल्या जात असलेल्या हरित बंदर उपक्रमात जेएनपीटी बंदर हरित बंदराचा दर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करील, असा विश्‍वास बंदर व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
शनिवार, 29 जानेवारी रोजी केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी देशात हरित बंदरे आणि हरित जहाज वाहतुकीच्या विकासासाठी मेरिटाइम इंडिया व्हिजन 2030 नुसार राबविण्यात येत असलेल्या विविध हरित उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सर्व प्रमुख बंदरे, सीएसएल आणि आयडब्ल्यूएआयच्या प्रमुख अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. बैठकीत जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी जेएनपीटीच्या हरित बंदर उपक्रमांविषयी माहिती दिली. “जेएनपीटीने बंदराच्या सर्व क्रियाकलापांचा समावेश असलेला एक कृती आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये माल हाताळणी, साठवण, निर्गमन आणि पर्यावरण जेएनपीटीच्या या कामगिरीबद्दल जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी बंदराचे सर्व कर्मचारी, अधिकारी व भागधारकांचे अभिनंदन केले.

Exit mobile version