। आगरदांडा । प्रतिनिधी ।
थोर क्रांतिकारक -वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुरुड जुनी पेठ येथील समाजसेवक -मोहन करंदेकर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी मोहन करंदेकर यांनी थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके व भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपल्या देशासाठी आपले जीवन हसत हसत दिले. अश्या वीर हुतात्वम्यांबद्दल त्याची वीरकथा सध्याच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांतुन शुर वीरांचा इतिहास नवीन पिढीला समजला पाहिजे. अशि प्रतिक्रिया मोहन करंदेकर यांनी मानवंदना देतेवेळी बोलत होते.