नारायण नागु पाटील यांना अभिवादन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी चळवळीचे अर्ध्वयु, कुळकायद्याचे जनक शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक स्व. नारायण नागु तथा नाना पाटील पाटील यांची जयंतीनिमित्त रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन आदरांजली अर्पण करण्यात आली. अलिबाग येथील शेतकरी भवन येथे शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी स्व. ना ना पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करुन आदराजंली अर्पण केली. यावेळी शेकापचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस तथा अलिबाग नगरपरिषदेतील शेकापचे गटनेते प्रदीप नाईक, यांच्यासह शेकापक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पेझारी, पोयनाड येथे तसेच खारेपाट विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल, खालापूर, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, सुधागड, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर अशा जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी नाना पाटील यांच्या कार्याचे स्मरण करीत त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

Exit mobile version