| अलिबाग | प्रतिनिधी |
कोकणचे भाग्यविधाते, शेतकरी, कष्टकरी, कामगार व गोरगरीबांचे कैवारी प्रभाकर तथा भाऊ पाटील यांचा स्मृतीदिन बुधवारी अलिबागमध्ये विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानात प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेस शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, यू.व्ही स्पोर्ट अकादमीच्या संचालिका चित्रलेखा पाटील, ॲड. विजय पेढवी, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, आदी मान्यवर, संघ मालक व खेळाडू उपस्थित होते.
रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ व स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचच्या वतीने प्रभाकर पाटील यांचा स्मृतीदिन अलिबागमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी अलिबागमधील प्रसिध्द व्यवसायिक गजेंद्र दळी यांच्या हस्ते प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सखाराम पवार, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, शरद कोरडे, निर्मला फुलगांवकर, माजी नगराध्यक्ष सतिश प्रधान, पोलीस पाटील विकास पाटील, प्रणाली पाटील, प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, ज्योती म्हात्रे, झेबा कुरेशी आदी मान्यवर , कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. यावेळी नागेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रभाकर पाटील यांच्या कार्याची माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्योती म्हात्रे यांनी गेल्या 28 वर्षापासून वाचनालयात ग्रंथपाल म्हणून काम केले. त्यामुळे त्यांचा या निमित्ताने म्हात्रे यांचा निर्मला फुलगांवकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
अलिबागमधील शेतकरी भवनमध्येदेखील प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.