। कर्जत । प्रतिनिधी ।
शहिद दिनानिमित्त बुधवारी (दि.23) कर्जत नगरपरिषदेतर्फे शहिदांना अभिवादन करण्यात आले. कर्जत नगरपरिषद कार्यालयात शहीद सुखदेव, शहीद राजगुरू, शहीद भगत सिंग यांच्या प्रितिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील, नगरसेवक राहुल डाळींबकर, सोमनाथ ठोबरे, नगरसेविका विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर आदींसह कर्मचारी सारिका कुंभार, विभावरी म्हामूणकर, शेखर लोहकरे आदी उपस्थित होते.