वाघ्रण आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन

| वाघ्रण | प्रतिनिधी |

तालुक्यातील वाघ्रण येथील आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमीपूजन शनिवारी उत्साहात पार पडले. राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या इमारतीच्या कामाचा शुभारंभ शेकाप कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता झालेल्या या कार्यक्रमात उपकेंद्राच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” समितीचे सदस्य तथा पत्रकार दिपक यशवंत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाला वाघ्रण आणि खारपेढांबे गावांतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यामध्ये आर. बी. पाटील, अविनाश म्हात्रे, नामदेव पाटील, तुकाराम पाटील, प्रमोद पाटील, गौतम पाटील, उदय पाटील, विद्याधर पाटील, गिरीश पाटील, दीपक पाटील, रविकीरण पाटील, एच. एन. पाटील, तनवेश पाटील, आत्माराम पाटील, माधव पाटील, असिता म्हात्रे, ललिता पाटील, अंजली म्हात्रे, बंदिनी पाटील, विवेक पाटील, संजय पाटील तसेच ठेकेदार प्रतिनिधी चिंतामण पाटील आदींचा समावेश होता. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.

Exit mobile version